

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातल्या पनियरा इथल्या नेत्यानं गळफास घेत आत्महत्या केलीय. निषाद पार्टीचे प्रदेश सचिव धर्मात्मा निषाद यांनी आत्महत्येआधी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय. यात योगी सराकरमधील मंत्र्यांसह त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी आरोप केला की माझा सतत छळ केला गेला. खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं. या त्रासाला कंटाळून मी टोकाचं पाऊल उचललंय.