Rajnath Singh Celebrates Holi
Rajnath Singh Celebrates Holi sakal

Rajnath Singh Celebrates Holi : राजनाथ सिंहांची लेहमध्ये सैनिकांसोबत होळी साजरी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (ता. २४) भारताची ‘शौर्याची राजधानी’ अशी ओळख असलेल्या लडाखमध्ये लष्कराच्या जवानांसोबत होळी साजरी केली.

लेह : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (ता. २४) भारताची ‘शौर्याची राजधानी’ अशी ओळख असलेल्या लडाखमध्ये लष्कराच्या जवानांसोबत होळी साजरी केली. तसेच प्रतिकूल हवामानाचा सामना करीत शत्रूंपासून देशाचे रक्षण केल्याबद्दल जवानांचे कौतुक केले. सिंग यापूर्वीही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनला जाणार होते.

मात्र खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडेही उपस्थित होते. या वेळी संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांच्या कपाळावर गुलालाचा टिळा लावल्याने सैनिक भारावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com