मी, तर भगवान हनुमानाचा वंशजः राजभर

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

लखनौः मी, तर भगवान हनुमानाचा वंशज आहे. मी म्हणजेच भगवान हनुमानाच्या वंशजाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे तेंव्हापासून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकदम शांत झाले आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.

राजभर हे नेहमी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करताना दिसतात. परंतु, रविवारी मात्र त्यांनी यू-टर्न घेतला. वाराणसी येथे पक्षाद्वारे आयोजित 'अति मागास, अति दलित अधिकार' रॅलीचे आयोजन करतण्यात आले होते. यावेळी बोलताना राजभर म्हणाले, 'मी, भगवान हनुमान यांचा वंशज आहे. मी हनुमानांचा वंशज असल्यानेच सपा आणि बसपा माझ्याशी आघाडी करत आहेत. पण मी भाजपबरोबरच आहे. सपा व बसपाने आपल्या कार्यकाळात ओबीसी आणि दलित समाजातील लोकांना लुटले आहे.'

'भगवान हनुमानाच्या वंशजाने जेंव्हापासून भाजपला पाठिंबा दिला आहे. तेंव्हापासून सपा आणि बसपा एकदम शांत झाले आहेत. दोन्ही पक्षांना ते एकट्याने लढू शकत नाहीत, हे समजले आहे. त्यामुळे सपा आणि बसपाने आघाडी केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाची 38 टक्के तर काही ठिकाणी 36 टक्के भागीदारी आहे. म्हणजेच 36 टक्के ओबीसी समाजाच्या मतांसह इतर जातीचे 20 टक्के मते एनडीएच्या खात्यात जमा होतील. ज्यांनी लुटण्यासाठी महाआघाडी स्थापन केली आहे. ते गंगा नदीत बुडून जातील,' असेही राजभर म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up minister suheldev bahujan samaj party chief omprakash rajbhar goes soft bjp calls descendant hanuman