यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

स्वाती सिंह फित कापून बिअर बारचे उद्घाटन करताना दिसत आहेत. त्यांच्याबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. स्वाती सिंह यांनी 20 मे रोजी या बारचे उद्घाटन केले.

लखनौ - उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांच्या हस्ते बिअर बारचे उद्घाटन होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याविषयीचा अहवाल मागविला आहे. स्वाती सिंह यांनी आता स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर जोरदार टीका होऊ लागली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप सरकारचा हाच खरा चेहरा आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला. योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्वाती सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 
 
स्वाती सिंह फित कापून बिअर बारचे उद्घाटन करताना दिसत आहेत. त्यांच्याबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. स्वाती सिंह यांनी 20 मे रोजी या बारचे उद्घाटन केले. त्या दयाशंकर सिंह यांच्या पत्नी आहेत. बसपच्या अध्यक्षा मायावती यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर दयाशंकर सिंह चर्चेत आले होते. या संपूर्ण वादावर स्वाती सिंह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: UP Minister Swati Singh inaugurates beer bar: CM Yogi Adityanath seeks report