आता येणार ई-पासपोर्ट; परराष्ट्र मंत्रालयाची तयारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

प्रवासाच्या कागदपत्रांसाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ई-पासपोर्टच्या निर्मितीला प्राधान्य देत परराष्ट्र मंत्रालयाने तसा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (ता.24) दिली. प्रवासाच्या कागदपत्रांसाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. 

सातव्या पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. चिपचा समावेश असलेला ई-पासपोर्ट नागरिकांना देण्याच्या योजनेसंदर्भात भारत प्रतिभूती मुद्रणालयाबरोबर बोलणी सुरू केली आहेत. ई-पासपोर्ट प्राधान्याने तयार करण्याचा आमचा प्रस्ताव आहे. यामुळे सुरक्षेची आधुनिक व्यवस्था असलेले नवे पासपोर्ट आगामी काळात तयार करणे शक्‍य होईल, असे त्यांनी सांगितले.

ज्या लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्र नाही, तेथे टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने गेल्या वेळच्या कार्यकाळात दिले होते, ते आता सरकार पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ministry of External Affairs proposes for E passport