Desh News : उझबेकिस्तान दुर्घटनेबाबत आरोग्य मंत्रालयाकडून चौकशी सुरू

मेरियन बायोटेकच्या नोएडा उत्पादन प्रकल्पात केंद्रीय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि उत्तर प्रदेशाच्या औषध परवाना प्राधिकरणाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
Ministry of Health
Ministry of Healthsakal
Summary

मेरियन बायोटेकच्या नोएडा उत्पादन प्रकल्पात केंद्रीय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि उत्तर प्रदेशाच्या औषध परवाना प्राधिकरणाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - उझबेकिस्तानच्या समरकंदमधील १८ बालकांच्या मृत्यूचा संबंध त्या देशाने भारतातील मेरियन बायोटेकने बनवलेल्या डॉक १ मॅक्स या खोकल्याच्या औषधाशी (कफ सिरप) जोडल्यानंतर केंद्र सरकारने या औषधाचे उत्पादन करणाऱया नोएडास्थित कंपनीत तपास सुरू केला आहे. १ मॅक्स सिरप हे या मुलांच्या मृत्यूचे कारण असल्याचे उझबेकिस्तानने म्हटले असले तरी या मुलांच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला न घेताच त्यांना प्रमाणापेक्षा जास्त हे औषध दिले होते असेही त्या देशाने नमूद केले आहे.

मेरियन बायोटेकच्या नोएडा उत्पादन प्रकल्पात केंद्रीय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि उत्तर प्रदेशाच्या औषध परवाना प्राधिकरणाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित कफ सिरपचे नमुने त्यांच्या नोएडातील कारखान्यातून घेण्यात आले असून ते चंदीगडमधील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या सूचनेनुसार सीडीएससीओ २७ डिसेंबरपासून पासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामक संस्थेच्या संपर्कात आहे. मेरियन बायोटेक ही एक परवानाधारक औषध उत्पादक कंपनी आहे आणि तिच्याकडे १ मॅक्स सिरप या खोकल्याच्या औषधाच्या निर्मितीचा परवाना आहे.

कॉंग्रेसकडून भारताचा अपमान

दरम्यान उझबेकिस्तानातील दुर्घटनेवरून भाजप व कॉंग्रेसमध्ये पुन्हा जुंपली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी झांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये ‘मेड इन इंडिया’ औषधांमुळे त्या मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे खालच्या पातळीवरील विधान असल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.

डॉक्टरांशी सल्लामसलत न करता या मुलांच्या पालकांनी त्यांना चुकीची औषधे दिल्याने त्या मुलांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती असताना भारताची बदनामी करण्यासाठी काँग्रेस पक्ष या पातळीवरील राजकारण करत आहे असे सांगताना भाजपने म्हटले आहे की असे निराधार आरोप करणे हा भारताचा अपमान असून तो भारतातील औषध उद्योगावरही हल्ला आहे. अशी बेजबाबदार विधाने करून, भारताची बदनामी करून, भारताच्या आर्थिक हिताला धक्का लावून कॉंग्रेस नेमके कोणाचे ‘हित' जपण्याचा प्रयत्न करतो आहे? असाही प्रश्न भाजपने विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com