पाकचे न्यूज अँकर्स चालवत होते भारतविरोधी सोशल अकाउंट्स; सरकारकडून मोठी कारवाई

Social Media
Social MediaSakal

नवी दिल्ली : भारतविरोधी खोटा, दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा कंटेट प्रसारित (Anti India fake and divisive contents) करण्याचा आरोप ठेवत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवरील काही अकाउंट्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३५ युट्यूब चॅनेल्स, २ ट्विटर अकाउंट्स, २ इन्स्टाग्राम अकाउंट्स, २ वेबसाईट्स आणि एक फेसबुक अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती खात्याच्या सचिवांनी दिली आहे. (YouTube Channels, Twitter Accounts, Instagram Accounts, Websites )

Social Media
भाजपविरोधात बंड! उत्पल पर्रिकर पणजीतूनच लढणार मात्र 'अपक्ष'

हे युट्यूब अकाउंट्स पाकिस्तानमधून चालवले जात असून या अकाउंट्सना तब्बल १.२ कोटी सबस्क्राईबर्स आहेत. तसेच या चॅनेल्सवरील व्हिडीओ कंटेटला १३० कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. यातील काही युट्यूब चॅनेल्स हे पाकिस्तानी टीव्ही न्यूज चॅनेल्सवरील अँकर्सकडूनही चालवली जात असल्याचं सांगण्यात आलंय.

या ३५ बंद करण्यात आलेल्या युट्युब चॅनेल्समधील अपनी दुनिया नेटवर्ककडून १४ युट्युब चॅनेल्स चालवण्यात येत होते. तर तल्हा फिल्म्सकडून १३ युट्यूब चॅनेल्स चालवण्यात येत होते. भारतातील लष्कराची माहिती, जम्मू आणि काश्मीर आणि अलिप्ततादवादी विचार आणि मते मांडणाऱ्या विषयांवर अत्यंत चुकीची आणि भारतविरोधी अशी माहिती प्रसारित केली जात होती.

Social Media
नाना पटोलेंच्या वक्तव्यातील 'गावगुंड मोदी' अखेर माध्यमांसमोर; मात्र...

या सगळ्या अकाउंट्सवरील कॉमन गोष्ट अशी होती की, हे सगळे विखार पसरवणारे अकाउंट्स पाकिस्तानातून चालवले जात होते. तसेच या अकाउंट्सवर भारतविरोधी आणि दिशाभूल करणारा खोटा मजकूर सातत्याने प्रसारित करण्यात येत होता. याबाबतची सविस्तर माहिती ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे.

असे अकाउंट्स बंद करण्याची ही प्रक्रिया आता सुरु झाली आहे तर यामध्ये अशा प्रकारचे आणखीही अकाउंट्स बंद करण्यात येतील. अशा प्रकारचे अकाउंट्स कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती आम्हाला द्यावी, आम्ही त्यावर नक्कीच कारवाई करु, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com