धक्कादायक! अल्पवयीन मुलीच्या ओठासह शरीरावर अगरबत्तीचे चटके, भोंदूबाबाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jharkhand Superstition Case

धक्कादायक! अल्पवयीन मुलीच्या शरीरावर अगरबत्तीचे चटके, भोंदूबाबाला अटक

नवी दिल्ली : भूतबाधा झाल्याचं सांगत एका भोंदूबाबाने १४ वर्षाय मुलीचा शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने तिच्या संपूर्ण शरीरावर अगरबत्तीचे चटके दिले. त्यामुळे या मुलीची मानसिक स्थिती खालावली आहे. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात (Superstition Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक रेल्वे अपघात : दोन एक्सप्रेस रद्द, राजधानीसह तीनचे मार्ग बदलले

झारखंडमधील (Jharkhand) छत्र जिल्ह्यात ही घटना घडली आहे. होळी खेळल्यानंतर मुलगी आजारी पडली. रुग्णालयात नेऊनही तिचा ताप उतरला नव्हता. तिला भूतबाधा झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आला. त्यानतंर तिला वाहिद या भोंदूबाबाकडे नेण्यात आले. तुमच्या मुलीला भूतबाधा झाली असून दोन ते तीन दिवसात ती ठणठणीत बरी होईल, असं भोंदूबाबानं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यांनी देखील या भोंदूबाबावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने सतत चार दिवस मुलीचा शारीरिक छळ केला. तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या चेहरा, ओठ, हातावर अगरबत्तीचे चटके देण्यात आले. त्यानंतर तिची मानसिक स्थिती खालावली.

मुलीची तब्येत खालावल्याने तिला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यामुळे तिला रांची येथील राजेंद्र रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भोंदूबाबाविरोधात लावलाँग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार आरोपी वाहिदवर पोक्सो कायदा आणि खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्याला अटक करण्यात आली, असे पोलिस अधीक्षक राकेश रंजन यांनी सांगितलं.

Web Title: Minor Girl Burned With Incense Sticks Superstition Case Jharkhand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jharkhandcrime