बलात्कारीत प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी तिने उचलले...

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

एक अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडाली होती. प्रियकर जामिनावर आल्यानंतर तिने त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी...

बरेली (उत्तर प्रदेश): एक अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडाली होती. प्रियकर जामिनावर आल्यानंतर तिने त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी कुटुंबियांच्या अन्नात विष मिसळले. कुटुंबातील सात जण बेशुद्ध पडल्यानंतर ती पळून गेल्याची घटना येथे घडली आहे.

मोरादाबाद जिल्ह्यात एका गावामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली होती. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. अल्पवयीन मुलीने त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी कुटुंबियांच्या अन्नामध्ये विष मिसळले. या अन्नाचे सेवन केल्यानंतर मुलीची आई, तिच्या दोन बहिणी, दोन भाऊ, वहिनी आणि भाचा असे सात जण बेशुद्ध पडले. कुटुंबातील सर्वजण बेशुद्ध पडल्याचे पाहून मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. कुटुंबातील सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या वडीलांना तक्रार दाखल केली आहे.

पोलिस अधीक्षक उदय शंकर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडीलांनी अरविंद कुमार याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले आहेत. मुलीच्या वडीलांनी डिसेंबर 2018 मध्ये अरविंद कुमारच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. अरविंद कुमार कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुलीच्या भावाला धमकावले होते. प्रेमसंबंधांना विरोध केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली होती. याबाबत पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor girl elopes with lover after poisoning family in UP