मी पुन्हा येईल अन् तुमच्याच मुलाशी लग्न करेल; अल्पवयीन मुलीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minor girl from Bihar reached Risod for Lover

मी पुन्हा येईल अन् तुमच्याच मुलाशी लग्न करेल; अल्पवयीन मुलीचा इशारा

वाशीम : प्रेम आंधळ असते. प्रेमात जात, धर्म, वय, रूप, दर्जा दिसत नाही असं म्हणतात. अशीच एक घटना रिसोडच्या वाशीम मार्गावरील परिसरात उघडकीस आली. दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. यातून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, वयाच्या उंबरठ्यावर हे मान्य नव्हते आणि ही गोष्ट संपुष्टात आली. (Minor girl from Bihar reached Risod for Lover)

प्राप्त माहितीनुसार, बिहारमधील झाढा येथील अल्पवयीन मुलगी आणि रिसोड शहरातील वाशीम मार्गावरील भागातील मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून (social media) झालेली ओळख प्रेमात परिवर्तीत झाली. बिहारमधील तरुणीने रिसोडच्या तरुणाशी सात जन्माचे बंधन बांधण्याचा निर्णय घेतला. यातूनच तिने बिहारमधील झाढा ते वाशीम रस्त्याने रिसोड (Risod) गाठले.

हेही वाचा: ‘मशीद बांधण्यासाठी ३६००० मंदिरे उद्ध्वस्त; ती पुन्हा मिळवू’

यादरम्यान ती प्रियकराच्या संपर्कात होती. याची माहिती ना मुलीच्या घरच्यांना होती ना मुलाच्या घरच्यांना. मात्र, परिस्थिती समजून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. २४ मे रोजी रिसोड पोलिस ठाण्यात बिहार येथील तरुणीच्या पालकांना बोलावून स्वाधीन करण्यात आले. सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमाला ब्रेक लागला.

मुलीने मुलाच्या पालकांना दिला इशारा

अल्पवयीन (Minor girl) असल्याने मुलगी सात जन्माच्या बंधनात अडकू शकली नाही. पालक घेऊन जात असताना मुलीने मुलाच्या पालकांना इशारा दिला की ‘मी पुन्हा परत येईल आणि तुमच्या मुलाशी लग्न करेल. माझे अन्यत्र लग्न केले तर त्याच्यासोबत राहणार नाही’. बिहारमधील झाढा गावातील पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा: Unlucky Plants : चुकूनही घरात लावू नका ही झाडे; होईल नुकसान

सोशल मीडियावर प्रेमाचा शोध

अल्पवयीन मुलीचे (Minor girl) पालक शिक्षक आहेत. आई-वडील तिला अजिबात वेळ देत नाहीत. उच्च शिक्षण घेण्यासाठी दबाव टाकतात, असे मुलीने पोलिस ठाण्यात सांगितले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी ते मारहाण करायचे. तिला आई-वडिलांचे प्रेम मिळाले नाही. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर (social media) प्रेम शोधण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीने दोन आधारकार्ड बनवले होते. त्यात एक कार्ड बनावट होते. ज्यावर मुलीचे वय १९ वर्षे दाखवले होते.

Web Title: Minor Girl From Bihar Reached Risod For Lover Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaSocial MediaLover
go to top