आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला, आठ वेळा अंडाशय...

minor girl rape 123.jpg
minor girl rape 123.jpg

आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना तामिळनाडूच्या इरोड या भागात घडली आहे. एका १६ वर्षांच्या मुलीला तिच्या अंडाशयातील अंडी विकण्यास भाग पाडण्यात आलं. चार वर्षात आठ वेळा असं करायला प्रवृत्त करण्यात आल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप समोर आले आहेत. (Tamilnadu Rape Case)

या मुलीला तिची आई आणि सावत्र वडिलांनी हे कृत्य करण्यात भाग पाडलं. आरोपी पुरुष आईचा मित्र होता. त्यांचे अनैतिक संबंध होते. तसेच लग्नही करणार असल्याचं समोर आलंय. आई मुलीला देखील या पुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगत असे. अनेकदा आईच्या मित्राने या मुलीचा बलात्कार केला. दहा वर्ष आणि सावत्र वडील सोबत राहतात.

तामिळनाडूच्या वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालनालयाच्या सहा सदस्यीय पथकाने 6 जून रोजी मुलीचा जबाब नोंदवला आहे. सहसंचालक ए विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धक्कादायक खुलासे केले आहेत. मुलीला तिचा अंडाशय प्रजननक्षमतेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यास भाग पाडण्यात आले होते.

गेल्या पाच वर्षांत केंद्रांमार्फत ही तस्करी पार पडली. मुलीच्या जबाबाच्या आधारे अधिकारी आता राज्यातील विविध प्रजनन केंद्रांची तपासणी करत आहेत. गुन्ह्याची माहिती असताना अशी सुविधा पुरवल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच डॉक्टरांच्या सहभागाचीही चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुलीसोबत शारीरिक संबंध आणि प्रत्येक अंडाशयाच्या विक्रीमागे २० हजार रुपये

अल्पवयीन मुलीला वयात आल्यापासून तिची अंडी विकण्यास भाग पाडले जात होते. तिचे सावत्र वडील सय्यद अली (४०) याने गेल्या पाच वर्षांत तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. एमुलीची आई एस इंद्राणी (वय -३३) ही तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. यानंतर तिचे अन्य एका पुरुषासोबत संबंध असल्याचं समोर आलं.

'मालती' नावाच्या मध्यस्थाच्या मदतीने पीडितेचे वेगळं वय असलेले बनावट आधार कार्ड बनवण्यात आले. यामध्ये 5,000 रुपये कमिशन देण्यात आले होते. तर मुलीच्या आईला प्रत्येक अंडाशयाच्या विक्रीनंतर 20,000 मिळत होते.

हा गुन्हा तेव्हा उघडकीस आला जेव्हा अल्पवयीन मुलीने तिच्या घरातून पळ काढला आणि सालेम येथे तिच्या मित्राच्या घरी आश्रय घेतला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने तरुणीने फिर्याद दिली. पोलिसांनी कलम 5(I),(m),(n)(अग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्स) यासह पोक्सो कायद्याच्या इतर कलमांनुसार आणि आयपीसी कलम 420(फसवणूक), 506(ii) आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य काही कलम यामध्ये लावण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com