

Mirzapur Train Accident Eight Devotees Killed After Being Hit by Train While Alighting on Wrong Side
Esakal
मिर्झापूरमधील चुनार रेल्वे स्थानकात बुधवारी भीषण दुर्घटना घडली. कालका-हावडा एक्सप्रेस ट्रेनने धडक दिल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व प्रवासी हे कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी आले होते. पण चुकीच्या बाजूला उतरल्यानंतर रुळ ओलांडताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरू असून रेल्वे प्रशासनानं चौकशीचे आधेश दिले आहेत.