Chhattisgarh: पुन्हा श्रद्धा वालकर.. बँकेत काम करणाऱ्या मुलीला बॉयफ्रेंडने जंगलात नेऊन मारलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhattisgarh

Chhattisgarh: पुन्हा श्रद्धा वालकर.. बँकेत काम करणाऱ्या मुलीला बॉयफ्रेंडने जंगलात नेऊन मारलं..

Chhattisgarh: दिल्लीमध्येच काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या खून प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले आहेत. ही घटना ताजी असतानाच छत्तीसगड मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात राहणारी २१ वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराने गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर तीला जाळून टाकले. कोरबा जिल्ह्यात राहणारी 21 वर्षीय तनू कुर्रे ही रायपूरमधील एका खासगी बँकेत काम करत होती. ती 21 नोव्हेंबरला बॉयफ्रेंड सचिन अग्रवालसोबत बालंगीरला निघाली होती.

प्रियकराने तनू कुर्रेला जंगलात फिरण्यासाठी घेवून जात तिची हत्या केली. त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. छत्तीसगडमध्येही श्रद्धाच्या निर्घृण हत्येसारखच एक प्रकरण समोर आले आहे. फरक एवढाच की, श्रद्ध प्रकरणात आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले होते.

या प्रकरणात तरुणाने आधी प्रेयसीला जंगलात गोळ्या घातल्या, नंतर पुरावा नष्ठ करण्यासाठी मृतदेह जाळला. छत्तीसगडमधील रायपूर येथून प्रेयसीला ओडिशात नेऊन आरोपीने हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणले. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी असलेली २१ वर्षीय तनु कुर्रे ही रायपूरमधील एका खासगी बँकेत काम करत होती. ती 21 नोव्हेंबरला तिचा प्रियकर सचिन अग्रवालसोबत बालंगीरला निघाली होती. मात्र यानंतर तनूच्या नातेवाईकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र फोनवर बोलणे होऊ शकले नाही. तनूच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ओडिशामध्ये पोहोचल्यानंतर सचिन तिला घरच्यांशी बोलूही देत ​​नव्हता. आणि त्यातच तिची हत्या केली आणि जाळून टाकले, पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Chhattisgarhpolicecrime