
अयोध्येत दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर आता खासदार अवधेश प्रसाद यांचा व्हिडीओ समोर आलाय. खासदार अवधेश प्रसाद यांनी या प्रकऱणी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं.