

Looking for a June Getaway? This Scenic Hill Station Offers the Perfect Escape
esakal
आपल्या अथांग नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक खजिन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुशीत अनेक अप्रतिम हिल स्टेशन्स वसलेली आहेत. '
पचमढी' सारख्या काही प्रसिद्ध जागांची नावे तर प्रत्येकाच्या जिभेवर असतात, परंतु आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील एका अशा छुप्या हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत, जे ब्रिटिश काळात इंग्रजांचा मुख्य बालेकिल्ला (गड) मानले जायचे. हे ठिकाण म्हणजे छिंदवाडा जिल्ह्यातील 'तामिया हिल स्टेशन' (Tamia Hill Station).