'कंपनी असावी तर अशी' कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली महागडी कार, Video पाहून नेटकरी म्हणाले, 'असं नशीब सगळ्यांचं नसतं'

DIWALI BONUS KIA SONET CAR GIFT TO EMPLOYEES: दिवाळी बोनस म्हणून मिठाई किंवा भेटवस्तू नव्हे, तर चक्क Kia Sonet कार! हरियाणातील पंचकुलाच्या Mits Healthcare कंपनीचा कर्मचाऱ्यांना कार भेट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
DIWALI BONUS KIA SONET CAR GIFT

DIWALI BONUS KIA SONET CAR GIFT

esakal

Updated on: 

DIWALI BONUS VIRAL VIDEO: दिवाळी आली की, चर्चा असते ती, लाडू, करंजी , मिठाई, फटाके आणि खास करून दिवाळी बोनसची. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देत असतात. कधी-कधी मिठाईचा बॉक्स, दिवे, भांडी किंवा डब्यांचा सेट असा दिवाळीचं गिफ्ट मिळतं. परंतु कंपनीनं मोठा नफा मिळाल्यामुळे दिवाळी बोनसमध्ये कर्मचाऱ्यांना चक्क किया सोनेट कार भेट दिली आहे. हरियाणातील पंचकूला इथल्या कंपनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com