मिझोराम सोडणार काँग्रेसचा 'हात'

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मिझोराम काँग्रेसचा हात सोडणार असल्याचे सुरवातीच्या कौलानुसार स्पष्ट झाले आहे. मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी दहापर्यंत एकूण 40 जागांपैकी मिझो नॅशनल फ्रंटला 23 तर काँग्रेसला 14 जागांवर आघाडी मिळाली होती.

मिझोरम- मिझोराम काँग्रेसचा हात सोडणार असल्याचे सुरवातीच्या कौलानुसार स्पष्ट झाले आहे. मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी दहापर्यंत एकूण 40 जागांपैकी मिझो नॅशनल फ्रंटला 23 तर काँग्रेसला 14 जागांवर आघाडी मिळाली होती.

दरम्यान, राज्यातील एकूण 40 जागांवर आज मतमोजणी होत आहे. मिझोराममधल्या मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीत मिझोराम पीपल्स कान्फरन्स, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. मिझोराममध्ये 40 जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये आठ राजकीय पक्षांच्या एकूण 209 उमेदवारांचं भविष्य आज ठरणार आहे. या निवडणुकीसाठी मिझोराममध्ये एकूण  7,70,395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 374,496 पुरुष, 3,94,897 महिला मतदारांचा समावेश होता.

मिझोराम- एकूण जागा 40 (बुहुमतासाठी- 21)
मिझो नॅशनल फ्रंट- 23
काँग्रेस - 14
इतर- 02

Web Title: Mizoram Assembly Election Results