मंगळावरील लोकांनाही वाटतंय की, पर्यावरणाला फक्त मोदीच वाचवू शकतात - BJP खासदार

त्यामुळे त्यांचे बॅनर मंगळावरही लावले आहेत असं भाजप खासदार म्हणाले
modi
modiSakal

कोणत्याही निवडणुका असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले जातात अशा प्रश्नावर उत्तर देताना भाजप खासदाराने एका वृत्तवाहिनीला अजब उत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी यांचे बॅनर मंगळ ग्रहावरही लावले आहेत असं ते म्हणाले आहेत. तर मंगळावर त्यांचे फोटो लावण्यामागचं कारणही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

(PM Modi's banner on planet mars bjp mp viral video)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाजप खासदाराला एका वृत्तनिवेदकाकडून एक प्रश्न विचारला जातो. दिल्ली महानगरपालिका किंवा गुजरात कोणत्याही निवडणुका असल्या तरी तुम्ही मोदींचे फोटोचे बॅनर का लावता? या प्रश्नावर खासदाराने उत्तर देताना सांगितलं की, "मोदींचे फोटो मंगळ ग्रहावरही लावले आहेत. कारण तेथील लोकांनाही वाटतंय की, फक्त नरेंद्र मोदी हेच पर्यावरणाला वाचवू शकतात" असं अजब वक्तव्य त्यांनी केलं आहे.

modi
'श्रीगणेश येशू मंदिराचा वर्धापन दिन अन् सत्यनारायण महापूजा'; Photo Viral

दरम्यान, सध्या या खासदाराच्या अजब वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर वृत्तनिवेदकाचीही बोलती बंद झाल्याचं आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com