
अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली, त्यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा विजय झाला.
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली, त्यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा विजय झाला. पराभव होऊनही ट्रम्प यांनी आपला पराभव स्वीकारला नव्हता. याचसंबंधी एक ऑडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याची तुलना वॉटरगेट प्रकरणाशी होत आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान पराभव होत असल्याचं पाहून जॉर्जियाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी दबाव आणला होता.
आता रामदेव बाबाही म्हणतात कोरोना लस घेणार नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मतदानातील घोटाळ्यामुळे झाल्याचा दावा केला होता. त्यांचा हा आरोप राज्य, निवडणूक अधिकारी आणि अनेक न्यायालयांनी फेटाळून लावला होता. ट्रम्प यांनी जॉर्जियाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि रिपब्लिकन नेता ब्राड रफेनस्पेर्गेर यांना फोन केला होता. विशेष म्हणजे याचवेळी अमेरिकी काँग्रेसमधील त्यांच्या काही सहकाऱ्यांनी बायडेन यांना विजयाचे औपचारिक पत्र देण्यास विरोध केला होता.
मला केवळ 11,780 मतांची गरज आहे
निवडणुकीमध्ये बायडेन यांना 306 आणि ट्रम्प यांना 232 मोट मिळाले होते. तसेच बायडेन यांना 70 लाख जास्त पॉप्युलर वोट मिळाले होते. अमेरिकी मीडियामध्ये आलेल्या ऑडिओमध्ये ट्रम्प वारंवार ब्राड रफेनस्पेर्गेर यांच्यावर दबाव आणत होते की, त्यांनी बायडेन यांना विजयी घोषित करु नये. ट्रम्प म्हणतात, तुम्ही एवढं काम करा. मला केवळ 11,780 मतांचा शोध घ्यायचा आहे.
भारतीय वस्तूंचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढवायला हवी- पंतप्रधान मोदी
जॉर्जियामध्ये तीनवेळा बॅलेटची मोजणी करण्यात आली होती, त्यातील दोन वेळा बायडेन यांच्या विजयाचे परिणाम आले होते. अंतिम परिणामात बायडेन 11,779 मतांनी विजयी झाले होते. जॉर्जियात एकूण 50 लाख वोट पडले होते. असे असले तरी ब्राड रफेनस्पेर्गेर यांनी ट्रम्प यांच्या दावा फेटाळहा होता, तसेच तुम्ही सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे अमेरिकेचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ट्रम्प किंवा रफेनस्पेर्गेर यांच्या ऑफीसने यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे. दुसरीकडे बायडेन यांच्या टीमने ट्रम्प यांचा फोन कॉल लोकशाहीवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी याची तुलना वॉटरगेट प्रकरणाशी केली आहे.