आमदार दिगंबर कामत एसआयटी चौकशीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

खाण घोटाळाप्रकरणी आरोपपत्र सादर करून एसआयटीने आणखी पुढील तपास सुरू ठेवला आहे.

गोवा - खाण घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची आज विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुमारे पाऊणतास चौकशी केली. त्यांना आज सकाळी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ते रायबंदर येथील एसआयटीच्या कार्यालयात हजर झाले.

चौकशीअंती पावणेबाराच्या सुमारास ते या कार्यालयातून निघून गेेले. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. यापूर्वीच खाण घोटाळाप्रकरणी आरोपपत्र सादर करून एसआयटीने आणखी पुढील तपास सुरू ठेवला आहे. तपासावेळी काही नवीन माहिती पुढे आल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी आमदार कामत यांना बोलावण्यात आले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MLA Digamber Kamat inquired by the SIT