
नुकताच जेईई मुख्य परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत अपय़श आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केलीय. जीवन संपवण्याआधी तिने चिठ्ठीही लिहिली असून त्यात आई-वडिलांची माफी मागितली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडलीय. मुलीच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना धक्का बसलाय. तर हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.