आमदाराच्या अंगरक्षकाकडे आले 100 कोटी रुपये

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

गुलाम हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावर 99 कोटी, 99 लाख, दोन हजार 724 रुपये असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच सोळंकी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. सोळंकी यांनी कानपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी कौशल राज शर्मा यांना याबाबत कळविले आहे

कानपूर - समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोळंकी यांचे अंगरक्षक गुलाम जिलानी यांच्या बॅंक खात्यावर अचानक 100 कोटी रुपये आढळल्याने त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे. हे पैसे कोणी व कधी त्यांच्या नावावर जमा केले हे गुलाम यांनाही माहीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गुलाम हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावर 99 कोटी, 99 लाख, दोन हजार 724 रुपये असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच सोळंकी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. सोळंकी यांनी कानपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी कौशल राज शर्मा यांना याबाबत कळविले आहे.
याबाबत माहिती देताना शर्मा यांनी मी एसबीआयच्या उप-महाव्यवस्थापकांशी चर्चा केली असून, त्यांनी गुलाम यांना एक अर्ज करण्यास कळविल्याचे सांगितले. सध्या गुलाम यांचे खाते बंद करण्यात आले असून, आता या खात्यातून कोणालाही पैसे काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: MLA's body guard's bank balance is Rs 100 crore