

Vidhan Parishad Election
Esakal
BJP Hit in Varanasi and Nagpur: देशातील चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या एकूण २८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात काही ठिकाणी भाजपने सरशी मारली तर काही जागांवर प्रादेशिक पक्षांनी विजय मिळवला. मतपत्रिकेवर झालेल्या या निवडणुकीचे निकाल ४० ते ५० तासांनी लागले आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमध्ये ही निवडणूक पार पडली. लखनऊत समाजवादी पार्टीचा विजय, कर्नाटकात काँग्रेसचा पराभव आणि वाराणसीसह नागपुरात भाजपला बसलेल्या धक्क्याची चर्चा होतेय.