पुढील निवडणुका बॅलट पेपरवर घ्या : राज ठाकरे

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएम मशिनच्या संदर्भात झालेल्या वादावर राज ठाकरे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडली.

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज देशातील मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सहा पाणी पत्र लिहिलं आहे.या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी देशातील ईव्हीएम मतदान प्रणालीला विरोध केला असून नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालावर ही संशय व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी आज दुपारी 12 च्या दरम्यान देशातील मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन चर्चा केली.राज यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आठ मुद्द्यांच्या आधारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.आपल्या मागण्यांवर निवडणूक आयोगाने गंभीरपणे विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी ही राज ठाकरे यांनी केली आहे.

लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीत तफावत का असा प्रश्न राज यांनी उपास्थित केला आहे.शिवाय लोकांचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर अढळ विश्वास बसणे महत्वाचे असून ईव्हीएसमवर लोकांनी संशय व्यक्त करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम बाबत आपण अनेक तज्ज्ञांशी तसेच सामाजिक संघटनांशी चर्चा केली असून या सर्व घटकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्याने पुढील निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी ही राज ठाकरे यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Raj Thackeray meets chief election commissioner