esakal | मोबाईलसाठी बापाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मोबाईलसाठी बापाची हत्या

sakal_logo
By
सुधीर काकडे

मोबाईल (Mobile) ही गोष्ट आता आपल्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. मात्र मोबाईलमध्ये असणारे वेगवेगळे अॅपप्लिकेशन वापरता वापरता कधी या गोष्टींचे व्यसन लागते ते समजत नाही. गुजरातच्या सुरत शहरात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत मोबाईलसाठी आत्महत्या आणि हत्या करण्यासारखे टोकाचे निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोबाईलच्या व्यसनामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.

फोनचा अतिवापर किती धोकादाय ठरु शकतो हे सुरत मधील या घटनेमुळे दिसुन आले आहे. यातील पहिल्या घटनेत मोबाईलवर जास्तवेळ का खेळतोस, असे म्हणत मुलाला रागावल्याने मुलाने थेट वडीलांची हत्या केली. या संदर्भात पोलिसांनी हाजिरामधील कावास गावातून एका १७ वर्षीय मुलाला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या घटनेत एका १६ वर्षीय मुलीने मोबाईलसाठी स्वत:चे जीवन संपवले आहे. मोबाईलचा अतिवापर केल्याने मुलीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते, म्हणून पालक मोबाईल देत नसल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

कुटूंबीयांनी संध्याकाळी बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेल्या या व्यक्तीला पाहिले आणि रुग्णालयात नेले. त्यावेळी रुग्णालयात त्या व्यक्तीला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता शवविच्छेदन अहवालातून असे समोर आले की, सदरील व्यक्तीचा मृत्यू हा गळा दाबल्यामुळे झाला आहे.

तर दुसऱ्या घटनेत सुरतच्या वेदनगर रोडवर राहणाऱ्या खुशबू उपाध्याय या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी लटकलेला आवस्थेत आढळला. मुलगी मोबाईलवर खूप वेळ घालवायची त्यामुळे तिचा मोबाईल पालकांनी घेतला होता. हा मोबाईल काढून घेतल्याने नाराज झालेल्या मुलीने आपले पालक घरी नसताना हे टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले.

loading image
go to top