युवकाच्या मृत्यूमुळे श्रीनगर, बडगाममध्ये इंटरनेट बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग, कुलगाम, पुलवामा, शोपियाँ या दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्यांसह श्रीनगर, बडगाम येथील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीला धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगर, बडगाम येथे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

शुक्रवारी सीआरपीएफच्या गाडीच्या धडकेत कैसेर अहमद हा 21 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्यामुळे श्रीनगर, बडगाम भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. सुरक्षारक्षकांवर दगडफेक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अफवांवर नियंत्रण मिळविण्यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग, कुलगाम, पुलवामा, शोपियाँ या दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्यांसह श्रीनगर, बडगाम येथील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Mobile Internet services suspended in Srinagar Budgam