Ganeshotsav Modak: सोन्याचा वर्क लावलेला मोदक २७ हजार रुपये किलो

Ganeshotsav : सोन्याचा वर्क, सुकामेव्याचे सारण आणि २२ हून अधिक फ्लेवरमुळे मोदकांची गोडी वाढली; किलोचा दर तब्बल २७ हजारांपर्यंत
Ganeshotsav Modak

Ganeshotsav Modak

sakal

Updated on

नाशिक : ब्लूबेरी, कुनाफा, मोतीचूर, पान, अंजीर, मलई, केसर, पिस्ता, खोबरे अशा तब्बल २२ प्रकारच्या मोदकांनी सोमवारी (ता. १४) गणेशोत्सवाची गोडी द्विगुणित केली. पारंपरिक उकडीच्या व तळणीच्या मोदकांबरोबरच बदलत्या खवय्यांच्या पसंतीनुसार विविध फ्लेवरचे मोदक बाजारात उपलब्ध झाले आहेत.

विशेष म्हणजे सुकामेव्याचे सारण असलेल्या मोदकांना सोन्याचा वर्क लावून ते तब्बल २७ हजार रुपये किलो दराने, तर चांदीचा वर्क लावलेले मोदक दोन हजार रुपये किलो दराने खास खवय्यांसाठी तयार करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com