मोदींनी मागितला जनाशीर्वाद!

मोदींनी मागितला जनाशीर्वाद!

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या शब्दावलीतील लोकशाहीचा महाउत्सव असलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आयोग व राजकीय पक्षांसह देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. एकशेतीस कोटी भारतवासी सत्तारूढ भाजपला २०१४ पेक्षाही चांगले यश मिळवून देतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक तारखा जाहीर होताच मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शहा व धडाकेबाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही निवडणुकीबाबतची ट्विट केली.  पंतप्रधानांनी म्हटले की आयोग, त्याचे कर्मचारी, सुरक्षादले, देशवासीय व राजकीय पक्षांना माझ्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांत १३० कोटी भारतीयांनी निराशावादातून बाहेर येऊन जो आशीर्वाद व सहभाग दिला त्यातून हे सिद्ध झाले की याआधी जे अशक्‍य होते ते आता शक्‍य झाले आहे. निवडणूक नामक लोकशाहीचा सण आला आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रत्येकाने सक्रिय  सहभागी व्हावे. या निवडणुकीत एतिहासिक मतदान होईल. विशेषतः पहिल्यांदाच मताधिकाराचा वापर करणाऱ्या युवकांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन मी करतो. 

अमित शहा यांनी म्हटले, की १७ व्या लोकसभेसाठी भारतीयांनी विक्रमी संख्येने मतदान करून भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा जिवंतपणा वाढविण्याचे आवाहन मी करतो.

मोदी उवाच...
जनतेने सुरक्षा जवानांचा आदर करून त्यांना सहकार्य करावे
व्हीआयपी संस्कृतीमुळे सुरक्षेत काही वेळा अडथळे
प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक शिस्त बाळगलीच पाहिजे
सीआयएसएफमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असणे ही आनंदाची बाब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com