"मोदी टीम म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

कोलकाता, : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोदींवर टीकास्त्र सुरूच आहे.

आज ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि त्यांची टीम अलिबाबा आणि चोरांची गॅंग असून, सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून स्वत: श्रीमंत होत आहेत, अशा शब्दांत टीका केली. पक्षाच्या बैठकीत नेत्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

नोटाबंदीनंतर हजारो मजूर आणि कलाकार बेरोजगारीमुळे आपल्या गावी परतले आहेत. याबाबतची माहिती आपण राष्ट्रपतींना दिली असल्याचे ममता म्हणाल्या. नोटाबंदीसंदर्भात पक्षाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली असून, त्याला दीड हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. काही दिवसांपूर्वीच ममता यांनी मिदनापूर आणि बांकुरा येथे भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

Web Title: modi and team alibaba