'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'च्या नात्यात आला दुरावा...

Modi bhakts married each other Alpika Pandey now accuses husband jay dave of torture
Modi bhakts married each other Alpika Pandey now accuses husband jay dave of torture

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'नंतर दोघांनी 31 डिसेंबर रोजी विवाह केला होता.

गुजरातच्या जामनगरचा रहिवासी जय दवे हा नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या प्रतिक्रियेला अल्पिका पांडे हिने लाइक केले. राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करता असताना एकमेकांच्या प्रेमात पडले व 31 डिसेंबर 2018 रोजी विवाहबद्ध झाले. त्यावेळी 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट' हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण, काही दिवसांमध्येच त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. छळ करण्याबरोबरच शिवीगाळ केल्याचा आरोप अल्पिकाने जय दवे याच्यावर केला आहे. भाजप आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्याने माझ्या परवानगीशिवाय माझ्या छायाचित्रांचा वापर केल्याचा आरोप अल्पिकाने केला आहे. जय दवेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने म्हटले आहे.

अल्पिकाने विवाहानंतर एका महिन्यातच जय दवेवर आरोप शिवीगाळ आणि छळ करण्याचे आरोप केला आहे. तिने म्हटले आहे की, 'मी आता 18 वर्षांची आहे आणि तो 29 वर्षांचा आहे. पण, त्याच्याकडे पाहून त्याचे वय जाणवत नाही. सर्वप्रथम त्याने माझ्या छायाचित्रांचा मला न सांगता स्वतःच्या प्रसीद्धीसाठी वापर केला आहे. भाजप आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्याने हे केले. त्याने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असून, मला इतका जास्त त्रास देण्यात आला की मी आत्महत्येचाही प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबियांनीसुद्धा त्यालाच साथ दिली. मला घऱातून बाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती. अनेकदा स्पष्टीकरण देऊनही त्यांना माझ्याबाबत संशय होता. मी, बाथरुममध्ये काय करते हे देखील मला त्यांना सांगायला लागयचे. याबरोबरच मी माझ्या फोनमध्ये काय करते हे सुद्धा सांगावे लागे, अन्यथा माझा मोबाईल हिसकावून घेतला जायचा. माझ्या वैयक्तिक जीवनाचा कधीच विचार केला नाही. त्याचे खरंच माझ्यावर प्रेम होते की नाही याबाबत आता माझ्या मनात शंका आहे. एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली असंच वागतो का?'

जय दवेचे पहिलं ट्विट-
'मोदीजी आम्ही तुमच्यावरील प्रेमाखातरच एकमेकांशी लग्न केले. मी, राहुल गांधी यांच्या फेसबुक पेजवर तुमच्या समर्थनाची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एका सुंदर मुलीने ती कमेंट लाइक केली. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो. देशासाठी दोघांनाही जगायचे आहे म्हणून आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला’. या ट्विटनंतर जयचं अभिनंदन करण्यास सुरूवात झाली होती. काही जणांनी ट्रोलही केले होते. यानंतर जयने त्याचे ट्विट डीलिट केले. पण नंतर पुन्हा एकदा त्याने डीलिट केलेल्या ट्विटचा फोटो पोस्ट केला आणि मला दुसरे ट्विट डीलिट करायचं होते पण चुकून हे डीलिट झाले, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर दुसऱया एका ट्विटमध्ये त्याने, 'माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये मी ट्रोल होण्याच्या भीतीतून ट्विट डीलिट केल्याचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. पण खरे म्हणजे ट्रोलिंग आणि टीकेची मला सवय झाली आहे. देशासाठीचं माझे समर्पण ट्रोलिंगमुळे कमी होणार नाही, जय हिंद', असे म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com