
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोलकता/ साहागंज (पश्चिम बंगाल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ममता बॅनर्जी म्हणाल्या, की हिंसेने काहीच साध्य होत नाही. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आहेत. ट्रम्प यांचे काय झाले. त्यांचे (मोदीं) यापेक्षाही अधिक हाल होतील. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आपण गोलकिपर होऊ आणि आपण त्यांना (भाजपला) एकही गोल करू देणार नाही. त्यांचे सर्व शॉटस गोल पोस्टच्या वर जातील. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीच्या सीबीआय चौकशीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, ही चौकशी महिलांचा अपमान आहे.
स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!
भाजपच्या राजवटीत महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या महिलांना भाजपमध्ये जावू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. तृणमूल पक्षात महिलांना सन्मान दिला जातो. आईप्रमाणे वागणूक दिली जाते. आपल्या राज्यात शांतता आहे, कारण आपली पश्चिम बंगालची भूमि ही माता-भगिनींची आहे. गुजरात बंगालवर नियंत्रण मिळवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, यावेळी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्यासह अनेक बंगाली कलाकारांनी आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
Edited By - Prashant Patil