esakal | स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!
sakal

बोलून बातमी शोधा

PM_Modi_Stadium

भारत आणि इंग्लंड या दोन देशांमधील तिसरा डे-नाईट कसोटी सामना येथे सुरू आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं.

स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली/पुणे : क्रिकेट आणि भारताचं अनोखं नातं आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमही याच देशात उभं राहिलं. गुजरातच्या मोटेरामधील सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आल्यानंतर देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

स्वामी नारायण मंदिर : 199 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जगातील पहिल्या मंदिराची स्थापना

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव मोटेरा स्टेडियमला देण्यात आले होते. पण आता या स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव या स्टेडियमला दिल्याने सरदार पटेलांचे चाहते, विरोधी पक्ष तसेच एकूणच देशभरातील क्रिकेटप्रेमींनी संताप जाहीर केला आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम ही भारतासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे, पण सरदार पटेलांचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव बदलायला नको होते, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचे मोठे यश​

आणखी एक गोष्ट म्हणजे या स्टेडियममधील बॉलिंग एंडला रिलायन्स एंड आणि अदानी एंड अशी नावे देण्यात आली आहेत. केंद्रातील मोदी सरकार हे नेम चेंजर गव्हर्नमेट असून हम दो हमारे दो अशा स्वरुपाचं असल्याची सडकून टीकाही यावेळी नेटकरी करत आहेत. 

शिवराजसिंह यांचे योगींच्या पावलावर पाऊल; मुघलकालीन शहराचं बदलणार नाव​

दरम्यान, भारत आणि इंग्लंड या दोन देशांमधील तिसरा डे-नाईट कसोटी सामना येथे सुरू आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image