मोदी औरंगजेबापेक्षा क्रूर सत्ताधीश - काँग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

नवी दिल्ली - आणीबाणीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली असून, अर्थमंत्री अरुण जेटलींनी इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘औरंगजेबापेक्षा क्रूर सत्ताधीश’ म्हटले असून त्यांच्या चार वर्षांच्या काळात लोकशाहीच कैदी झाली असल्याची तोफही डागली आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘पंतप्रधान मोदी हे दिल्लीच्या सत्तेचे औरंगजेबापेक्षाही क्रूर हुकूमशहा आहेत. औरंगजेबाने पित्यालाच तुरुंगात टाकले होते; पण मोदींनी लोकशाहीला आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षालाच कैदेत टाकले आहे,’ अशी टीका त्यांनी केली. राजेरजवाड्यांचा तनखा रद्द करणे, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, भूमीसुधारणा कार्यक्रम या इंदिरा गांधींच्या जनहिताच्या कार्यक्रमांना जनसंघाने विरोध केला होता, आता ४३ वर्षांनंतर भाजपने धनदांडग्यांची पाठराखण चालविली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Modi is a brutal ruler than Aurangzeb Congress Politics