
Medical Seats Cabinet Meeting Approved
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यमान राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालये, स्वतंत्र पदव्युत्तर संस्था आणि सरकारी रुग्णालयांच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या (सीएसएस) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ५,००० पदव्युत्तर जागा वाढवल्या जातील. विद्यमान सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या श्रेणीसुधारित करण्यासाठी सीएसएसचा विस्तार करून ५,०२३ एमबीबीएस जागा वाढवल्या जातील.