केंद्रातील नरेद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. हा विस्तार जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी माहिती पुढे आली आहे.