esakal | कॅबिनेट विस्तारानंतर PM मोदींच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Pm Modi

कॅबिनेट विस्तारानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक सुरु

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली सुरुवात झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून व्हर्च्युअली ही बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय तसेच मंत्रालयांच्या वाटपाबाबतही चर्चा होऊ शकते. (Modi first meeting begins after cabinet expansion Possibility of im decisions)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DRS) या भत्त्यांबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहेत. गेल्यावर्षी हे भत्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा मागच्या थकीत भत्यांसह यंदा भत्ते देण्याची घोषणा होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.

नव्या मंत्र्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या दिल्या सूचना

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात सामिल झालेल्या नव्या ४३ मंत्र्यांना माध्यमांशी जास्त न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली न सोडण्याचे आदेश देतानाच लवकरात लवकर मंत्रालयांचा ताबा घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

loading image