बापरे! मोदी सरकारने जाहिरातबाजीवर उधळले 5,245 कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आता मोदी सरकारकडून सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आज (शुक्रवार) देण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांकडून जाहिरातबाजीवरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला जात आहे. विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून आता गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण्यात आला, याची माहिती देण्यात आली. याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत सांगितले की, 2014 पासून ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीदरम्यान सरकारी योजनांच्या प्रचारावर एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आला.

दरम्यान, केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Modi Government Advertisements total Expenses of Rs 5245 Crore