Affordable Rental Housing Scheme
esakal
शहरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता अनेकांसाठी महागडं झालं आहे. घरांच्या किमती वाढत असल्याने सामान्य माणसाला घर घेणं कठीण होत चाललंय. त्यामुळे अनेक नोकरदार आणि कामासाठी शहरात आलेले लोक भाड्याच्या घराचा पर्याय निवडतात. पण शहरात परवडणारं आणि चांगलं घर मिळणं हीदेखील मोठी कसरत असते.
अशा लोकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.० अंतर्गत एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतील अफोर्डेबल रेंटल हाउसिंग म्हणजेच ARH व्यवस्थेमुळे पात्र लोकांना शहरांमध्ये कमी दरात भाड्याची घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे.