
नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वांत मोठ्या धोक्यांपैकी एक म्हणजे नक्षलवाद. सामाजिक-आर्थिक विषमतेतून सुरु झालेल्या संघर्षाला माओवादी विचारसरणीमुळे अधिक धार आली. नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असून आता या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समोर येत आहे. पुढील वर्षी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला आहे.