Central Government Cabinet Meeting Diwali Bonus
ESakal
देश
Diwali Bonus: मोदी सरकारकडून सर्वात मोठी भेट! कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर, पण कुणाला? जाणून घ्या...
Modi Government Cabinet Meeting: मोदी सरकारने सर्वात मोठी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळी आणि छठपूजेच्या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. बुधवार २४ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०.९१ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला. यासाठी केंद्र सरकारने १,८६५.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे.

