Asaduddin Owaisi : देशात मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातोय; ओवैसी मोदी सरकारवर का भडकले?

'मुस्लिमांना जीवे मारण्याची धमकी दिली जात नाही असा एकही महिना नाही.'
Asaduddin Owaisi News
Asaduddin Owaisi Newsesakal
Summary

'तुम्ही महिला शक्तीबद्दल बोलता, पण मुस्लिमांसोबत भेदभाव केला नसता तर बिल्किस बानोला (Bilkis Bano) न्याय मिळाला असता.'

Asaduddin Owaisi News : देशात मुस्लिमांसोबत (Muslims) भेदभाव केला जात आहे. बिल्किस बानोला न्याय मिळाला नाही. कारण ती मुसलमान होती, असा आरोप एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर केलाय.

लोकसभेत बोलताना ओवैसी म्हणाले, 'मुस्लिमांना जीवे मारण्याची धमकी दिली जात नाही असा एकही महिना नाही. अर्थसंकल्पात मुस्लिम मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती कमी करण्यात आलीये. निधी 40 टक्के कमी करण्यात आलाय.'

Asaduddin Owaisi News
Mahua Moitra : मी सफरचंदला सफरचंदच म्हणेन, संत्री नाही; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर TMC खासदार भाजपवर भडकल्या

ओवैसी (Asaduddin Owaisi) पुढं म्हणाले, सरकारचाच डेटा सांगतो की 25 टक्के मुस्लिम मुलं गरिबीमुळं शिक्षण घेऊ शकत नाहीत. यानंतरही सरकारनं अल्पसंख्याक कल्याणाच्या बजेटमध्ये कपात केलीये. अर्थसंकल्पात 19 टक्के अल्पसंख्याकांचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. सरकारनं बजेट 40 टक्के कमी केलं आणि शिष्यवृत्ती 560 कोटींनी कमी केलीये, असा आरोपही त्यांनी केलाय.

Asaduddin Owaisi News
Political News : 'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून परमेश्वराचाच पराभव केला; भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार

तुम्ही महिला शक्तीबद्दल बोलता, पण मुस्लिमांसोबत भेदभाव केला नसता तर बिल्किस बानोला (Bilkis Bano) न्याय मिळाला असता. देशातील 1 टक्के लोकांकडं 60 टक्के संपत्ती आहे. त्यामुळं काही मोजक्याच लोकांना संधी मिळालीये. जे देशाची संपत्ती घेऊन पळून जाताहेत ते मुघल नाहीत. 48 लोकांच्या यादीत एकही मुस्लिम व्यक्ती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com