आता 'ही' योजना आणणार 'अच्छे दिन'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून देशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार आता केंद्रातील मोदी सरकार 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' (यूबीआय) आणण्याचा विचार करत आहे. यूआयबी लागू झाल्यास देशातील नागरिकांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला. या पराभवानंतर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी यूबीआय ही योजना आणण्याचा विचार केला जात आहे. ही योजना लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: याबद्दल मंत्रिमंडळासोबत चर्चा करत असून, ही योजना कशा पद्धतीने लागू केली जाऊ शकते. यावर विचार सुरु आहे. सध्या काही राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेवर सध्या विचार सुरु असल्याने ही योजना केव्हा लागू होईल, याबाबची घोषणा अद्याप झालेली नाही. 

दरम्यान, यूबीआय योजना देशभरात लागू झाल्यास देशातील नागरिकांच्या खात्यांत काही प्रमाणात रक्कम जमा होणार आहे. 

Web Title: Modi Government Planning to Launch UBI Sceme