E20 पेट्रोलचा वाद, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांना मिळणार दोन पर्याय; पण कधीपासून?

Modi government E20 petrol latest update : सरकार लवकरच ग्राहकांना इंधन निवडीचे दोन पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. त्यानुसार वाहनधारकांना इथेनॉलमिश्रित पेट्रोल किंवा साधे पेट्रोल, यापैकी आपल्या गरजेनुसार पर्याय निवडता येणार आहे.
Modi government E20 petrol latest update

Modi government E20 petrol latest update

esakal

Updated on

देशात सध्या इथेनॉलमिश्रित (E20) पेट्रोलच्या वापराबाबत मोठी चर्चा सुरू आहे. या इंधनामुळे काही वाहनांच्या इंजिनावर परिणाम होत असल्याचा दावा वाहनधारकांकडून केला जात असला, तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र, वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ग्राहकांना इंधन निवडीचे दोन पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com