esakal | लशीची ऑर्डर दिली नसल्याचा अदर पूनावालांचा आरोप खोटा; केंद्राचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

लशीची ऑर्डर दिली नसल्याचा अदर पूनावालांचा आरोप खोटा; केंद्राचा खुलासा

लशीची ऑर्डर दिली नसल्याचा अदर पूनावालांचा आरोप खोटा; केंद्राचा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाच्या लशींची नवी ऑर्डर केंद्र सरकारने दिलीच नसल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांच्या बातम्यांना आता केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. या प्रकारच्या बातम्या या निराधार आहेत, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं आहे. अदर पूनावालांनी केलेल्या आरोपावर आता केंद्र सरकार आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने ऑर्डरच दिली नसल्याचा आरोपावर आपला बचाव करण्याचा प्रयत्न या खुलाशातून करण्यात आला आहे.

लशीची ऑर्डर न मिळाल्याचे अदर पूनावालांनी केलेले आरोप आता केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारने सीरमकडे 10 कोटी तर भारत बायोटेककडून 2 कोटी लशींची ऑर्डर देण्यात आली होती, असं सांगितलं आहे. सरकारने या सीरमला ₹1,732.50 कोटींची रक्कम दिली आहे, ज्यामधून मे, जून आणि जुलै महिन्यात आपल्याला लस मिळतील, असं केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय भारत बायोटेककडे दोन कोटींच्या लशीची ऑर्डर देण्या आली आहे. या लशी पुढच्या तीन महिन्यात येतीलच. मात्र सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मिळून 75 लाख लशींचे डोस शिल्लक आहेत. याशिवाय आणखी 59 लाख लशींचे डोस येत्या तीन दिवसात उपलब्ध होतील.

हेही वाचा: नंदीग्राममध्ये भाजप कार्यालयात तोडफोड

या कथित बातम्यांनुसार, दोन लस निर्मात्यांना मार्च 2021 मध्ये दिलेल्या शेवटच्या ऑर्डर्सनुसार सीरम इन्स्टिट्यूटला 100 दशलक्ष डोसची ऑर्डर तर भारत बायोटेकला 20 दशलक्ष डोसची ऑर्डर देण्यात आली होती. माध्यमांतील ऑर्डर न दिल्याच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत. या बातम्या वास्तवावर आधारलेल्या नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयाने एका प्रेस रिलीजद्वारे दिला आहे.

या प्रकारची बातमी सर्वांत आधी बिझनेस डेलीमध्ये आणि त्यानंतर सगळीकडे आली. या बातमीनुसार, अनेक लशीकरण केंद्रावर लशीचा तुटवडा असून देखील केंद्र सरकारने लशीची ऑर्डर या दोन्हीही कंपन्यांना दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविशील्ड लशीच्या उत्पादनाची क्षमता ते का वाढवत नाहीत? असा सवाल पूनावालांना विचारण्यात आला असता त्यांनी म्हटलं होतं की, सरकारकडून लशीची आणखी ऑर्डर प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे वर्षाला 1 अब्ज डोसच्या वर उत्पादनाच्या वर उत्पादन करण्याची गरज कंपनीला वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top