esakal | नंदीग्राममध्ये भाजप कार्यालयात तोडफोड; बंगालमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नंदीग्राममध्ये भाजप कार्यालयात तोडफोड

नंदीग्राममध्ये भाजप कार्यालयात तोडफोड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदिग्राम - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. मात्र निकालानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी नंदीग्राममध्ये गोंधळ झाला असून भाजपच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रकार झाला. याशिवाय कार्याला आग लावण्याचाही प्रयत्न केला. भाजपने आरोप केला आहे की, हे सर्व तृणमूल काँग्रेसनं केलं आहे. फक्त भाजप कार्यालयच नाही तर अनेक दुकाने आणि घरांमध्येही तोडफोड, आग लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. भाजपचा आरोप आहे की, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनास्थळी असलेले समाजकंटक पळून गेले. या घटनेनंतर नंदीग्राममधील वातावरण तणावापूर्ण बनले आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला असला तरी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला. ममतांना भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांनी पराभूत केलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. रविवारपासून आतापर्यंत बंगालमध्ये हिंसाचाराने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दक्षिण 23 परगणा, नदियामध्ये भाजप कार्यकर्ता, वर्धमानमध्ये तृणमूल आणि उत्तर 24 परगणा इथं ISF कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: VIDEO: नंदीग्रामचा नायक सुवेंदु, लढले आणि जिंकले सुद्धा

रविवारी रात्री कोलकात्यात एका भाजप कार्यकर्त्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या सगळ्यात पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष राज्यपालांची भेट घेऊन हिंसाचाराबद्दलची माहिती देणार आहेत. भाजपने असा आरोप केला आहे की, कूचबिहारमधील सीतलकुचीमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती. यात गोळी लागून भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

बंगालच्या निवडणुकीत तृणमूलने मोठा विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्यांदा सत्ता हातात राखली आहे. तृणमूलने बंगालमध्ये 213 तर भाजपने 77 जागा मिळवल्या आहेत. तर एक अपक्ष आणि एक RSMP ने जिंकली आहे.

loading image
go to top