मोदी सरकार HAL मधील भागिदारी विकणार; OFS च्या माध्यमातून विक्री

modi hal
modi hal

नवी दिल्ली - मोदी सरकारने हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमेटेडमधील (एचएएल) मधील भागिदारी विकण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून एचएएलमधील 10 टक्के भागिदारी केंद्र सरकार विकणार असल्याचे वृत्त सीएनबीसीने दिले आहे. ऑफर फॉर प्राइससाठी फ्लोइर प्राइस 1001 रुपये प्रत्येक शेअरसाठी ठेवण्यात आली आहे. आजपासून नॉन रिटेल इन्व्हेस्टर्सना ऑफर फॉर सेल खुला केला जाणार असल्याचंही म्हटलं आहे. 

एचएएस ही नवरत्न कंपनी असून संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. जून 2007 मध्ये कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला होता. कंपनी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने करते. त्याशिवाय उत्पादनांची डिझाइन, देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे कामही कंपनी करते. आतापर्यंत कंपनीने अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स आणि त्यांच्या भागांची निर्मिती केली आहे. तेजस, ध्रुव, चीता, चेतक, लेन्सर आणि रुद्रा ही लढाऊ विमाने याच कंपनीने तयार केली आहेत. कंपनीने अनेक उत्पादनांचे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले आहे. तसंच लायसन्स अॅग्रीमेंटसुद्धा केलं आहे.

एचएएलने ठेवलेली फ्लोअर प्राइस ही सध्याच्या शेअर बाजारातील दरापेक्षा जवळपास 15 टक्के कमी आहे. बुधवारी एनएसईवर HAL चा शेअर 1177 रुपयांवर बंद झाला. ओएफएसच्या माध्यमातून केंद्र सरकारने 3 कोटी 34 लाख 38 हजार 750 शेअर्स विक्री करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याशिवाय 5 टक्के भागिदारी म्हणजेच 1 कोटी 67 लाख 19 हजार 375 इक्विटी शेअर्स विकण्याचाही पर्याय आहे.  

ऑफर फॉर सेल म्हणजे काय
शेअर बाजारात रजिस्टर असलेल्या कंपन्या त्यांची भागिदारी कमी करण्यासाठी ऑफर फॉर सेल वापरतात. यामध्ये सेबीच्या नियमानुसार कंपनीला याबाबतची माहिती दोन दिवस आधीच सेबी, एनएसई आणि बीएसईला द्यावी लागते. यानंतर एनएसई आणि बीएसईला माहिती देऊन गुंतवणूकदारांना प्रक्रियेत सहभागी होता येतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com