मोदी सरकार हेडलाईन आणि मार्केटिंगचे: लालू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी "हे सरकार हेडलाईन आणि मार्केटिंगचे सरकार' असल्याचे म्हटले आहे.

पाटना (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी "हे सरकार हेडलाईन आणि मार्केटिंगचे सरकार' असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरद्वारे टीका करताना लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, 'अडीच वर्षात यांची (एनडीए सरकार) एवढी खराब अवस्था होईल, असे यांना कधी स्वप्नातही वाटले नसेल. हेडलाईन आणि मार्केटिंग करणाऱ्या सरकारसाठी हे पुरेसे आहे. देशात हुकूमशाहीची चाहूल लागली आहे. घटनात्मक आणि लोकशाहीचे मूल्य धोक्‍यात आले आहे. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना अटक केले जात आहे. त्यांच्यावर बंदी आणली जात आहे.' तसेच 'अभिव्यक्ती आणि अशासकीय संस्थांचे स्वातंत्र्य ज्यांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेने काय धडा दिला, हे कधीही विसरता कामा नये' असा इशाराही त्यांनी दिला आहे. एकामागोमाग एक केलेल्या ट्विटस्‌मध्ये लालू यांनी 'मोदीजी, हा कोणत्या लोकशाहीचा किल्ला लढवित आहात? देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे' असेही म्हटले आहे.

कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनीही मोदी सरकारवर टीका करताना मोदींच्या गुजरात मॉडेलचा खरा चेहरा समोर येत असल्याचे म्हटले आहे. "एनडीटीव्ही' वर एक दिवसाची बंदी आणण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Web Title: Modi govt is Headline and Marketing govt : Lalu