
Narendra Modi: लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची सर्व माहिती दिली. जगभरातल्या कुठल्याही नेत्याने मला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी फोन केला नाही, असं मोदींनी सांगितलं. शिवाय अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला तेव्हा काय घडलं, हेही मोदींनी सांगितलं.