

India France Relations Boost as 21 Deals Signed in Mumbai
Esakal
Modi Macron Meeting in Mumbai 21 Agreements Signed भारताने आज फ्रान्ससोबतच्या मैत्रीसंबंधांना अधिक दृढ करताना संरक्षण, व्यापार आणि दुर्मीळ खनिजे आदी क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही देशांनी हे मैत्रीसंबंध आता 'विशेष वैश्विक आणि रणनीतिक भागीदारीच्या पातळीवर' नेण्याचा निर्धार केला. 'जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हे सहकार्य एखाद्या शक्तीसारखे काम करेल,' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला.