मोदींचा पुतीन यांना फोन; रशियासोबत तब्बल इतके फायटर जेट खरेदीचा करार

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जुलै 2020

भारत आणि चीनमध्ये तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केला होता. विशेष म्हणजे त्यांची चर्चा झाल्याच्या काही तासातच दोन्ही देशांमध्ये एक मोठा संरक्षण करार झाल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे.

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केला होता. विशेष म्हणजे त्यांची चर्चा झाल्याच्या काही तासातच दोन्ही देशांमध्ये एक मोठा संरक्षण करार झाल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 फायटर जेट खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी एकूण 18 हजार 148 करोड रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यात भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 लडाऊ विमानं खरेदी करणार आहे.

भारताला डिवचणाऱ्या चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनावले खडेबोल
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 फायटर जेट खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. यात 12 सुखोई-30 विमान आणि 31 मिग-29 विमानांचा समावेश आहे. यासोबत पूर्वी पासूनच भारतीय लष्करात तैनात असणाऱ्या 59 मिग-29 विमानांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 18,148 रुपयांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

संरक्षण मंत्रालयाने 248 एअर मिसाईल खरेदीलाही परवानगी दिली आहे. या खरेदीमुळे हवाई दल आणि नाविक दल यांना फायदा होणार आहे. यासोबतच DRDO द्वारे बनवण्यात आलेल्या 1000 किलोमीटर रेंज असणाऱ्या क्रूज मिसाईलच्या डिजाईनलाही मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शस्त्रास्त्र खरेदीचा सपाटा लावला असल्याचं दिसत आहे.

सप्टेंबरपर्यंत 6 राफेल विमानांची खेप भारतात पोहोचणार आहे. राफेल विमानं भारतीय लष्करात सामील झाल्यास भारताची सामरिक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राफेल विमानावर हवेतून हवेत मारा करणारे जगातील सर्वातील वेगाचे मिसाईलही लावलेले असणार आहे.

शिवसेनेच्या आमदार खासदारांनी तिवरेवासीयांना चुना लावायचेच केले काम : निलेश राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना फोन केला होता. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात विजयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रशियाला शुभेच्छा दिल्या. पुतीन 2036 पर्यंत राष्ट्रपतीपदी विराजमान राहतील अशी रशियाच्या संविधानात तरतुद करण्यात आली आहे. याबाबतही त्यांनी पुतीन यांना शुभेच्छा दिल्या. पुतीन यांनी भारत आणि रशियामधील सामरिक संबंध मजबूत होण्यावर आपला भर असेल असं म्हटलं आहे. चीनसोबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला महत्व आहे. 

अमेरिकेचे F-35 स्टील्थ लडाऊ विमान जगातील सर्वाधिक शक्तीशाली फायटर जेट मानले जाते. याला टक्कर देणारे फायटर जेड विमान रशियाने जगासमोर आणले आहे. रशियाने शक्तीशाली लडाऊ विमान सुखोई-57E  मैदानात उतरवले आहे. हे विमान रडारच्या कचाट्यात न येता सुपरसोनिक वेगाने शत्रूच्या ठिकाणांना उद्धवस्त करु शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi phone call to Putin agreement to buy fighter jets with Russia shortly